Highlighted News

पुणे जिल्हा हादरला! आई- मुलाने इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन; पती IT कंपनीत नोकरीला

मंगेश गायकवाड कार्यकारी संपादक,संजीवनी न्यूज

आई- मुलाने इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन;पती IT कंपनीत नोकरीला

पुणे

पिपरी चिचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका उच्चभ्रू इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून आई आणि मुलाने उडी घेत आपले आयुष्य संपावले आहे. थेरगाव वाकड परिसरातील सिग्नेचर पार्क या उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. आई एकता भांगड(33), मुलगा माधव भांगड (6 ) असे आत्महत्या केलेल्या माय लेकाराचे नाव आहे. मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थेरगाव वाकड परिसरातील सिग्नेचर पार्क या इमारतीत राहणाऱ्या एकता भांगड यांनी आपल्या राहत्या इमारतीच्या 18 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. ही घटना सायंकाळच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे.

अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. त्यानंतर आई- मुलाचे चे पार्थिव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

प्राथमिक तपासात आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पती आयटी कंपनीत नोकरीला

याबात त्यांच्या कुटुंबियांची आणि शेजारच्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. भांगड कुटुंब राजस्थानचे असून घरात तीनच व्यक्ती राहता. पती आयटी कंपनीत काम करत आहे. एकता भांगड या पती मनोज भांगड आणि मुलगा माधव यांच्यासोबत मागील काही वर्षांपासून या सोसायटीमध्ये वास्तव्यास होत्या. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. या दुर्घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, एकता यांनी आपल्या चिमुकल्या मुलासह इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून वाकड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button