कोल्हापूरछत्रपती संभाजीनगरनवी मुंबईपालघर

राजुरी विद्यालयास संगणक भेट

राजुरी विद्यालयास संगणक भेट; विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी

वाघापूर, दि. २६ (वार्ताहर) — खानापूर (पुणे) निसर्ग महिला बालकल्याण व कृषी विकास संस्था संचलित राजुरी माध्यमिक विद्यालयास पाच संगणक संच भेट देण्यात आले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत कुंभारकर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत कुंभारकर यांच्या हस्ते संगणक संचांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक नसीर बागवान यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास डॉ. संदीप कोलते, राजुरी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष तसेच स्थानिक पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सुरेश भगत, उद्योगपती अर्जुनराव कोलते, राजुरीचे उपसरपंच संपत चोरघडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संभाजी चव्हाण, राजुरीचे माजी उपसरपंच तात्या गायकवाड, ज्येष्ठ सहशिक्षक महादेव गायकवाड, गणेश कोलते, संजय लडकत, कल्पना जगताप, श्रद्धा इथापे, संगीता चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

संगणक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा मिळावी यासाठी संगणक संचांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल साधनांचा वापर करण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कोलते यांनी केले. सहशिक्षिका कल्पना जगताप यांनी आभार मानले.

छायाचित्र कॅप्शन:
राजुरी : विद्यालयातील विद्यार्थ्यांना संगणक संच भेट देताना मान्यवर.

स्रोत: वार्ताहर, संजीवनी न्यूज

Related Articles

Back to top button