Uncategorized

पुरंदर तालुक्यातील भयानक प्रकार! जुन्या वादातून मेडिकल चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण;सुमारे दीड लाखाचे नुकसान,पाच जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

संजिवनी न्युज

पुरंदर तालुक्यातील भयानक प्रकार!
जुन्या वादातून मेडिकल चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण;सुमारे दीड लाखाचे नुकसान,पाच जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे

जुन्या वादातून मेडिकल चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दुकानातील सामानाची तोडफोड करून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास मेन रोड येथील निलेश मेडिकलमध्ये घडली. याप्रकरणी प्रतीक सुहास हाले (वय २४, रा. होले बिल्डिंग, सासवड) यांनी तक्रार दिली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून आशिष राऊत, अनुज राऊत, शैलेश राऊत, महेश राऊत व ओंकार विजय राऊत (सर्व रा. हिवरकर मळा, सासवड) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आशिष व अनुज राऊत यांनी फिर्यादीची कॉलर पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर उर्वरित आरोपींनी लाकडी काठ्यांनी दुकानाची तोडफोड करून फिर्यादी व त्यांचा भाऊ प्रसाद यास मारहाण केली आणि नातेवाईकांना शिवीगाळ करत दमदाटी केली, असा आरोप फिर्यादी यांनी केला आहे. 

Related Articles

Back to top button