Uncategorized

NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, नोंदणी आणि वितरणाची पद्धत बदलली; काय आहे नवा नियम?

संजिवनी न्युज

NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, नोंदणी आणि वितरणाची पद्धत बदलली; काय आहे नवा नियम?

पुणे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सवलतींचा प्रवास अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) योजनेत महत्त्वाचे बदल केले आहेत.

ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू असून, एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी काही नवीन आणि सोयीस्कर सुविधा जाहीर केल्या आहेत.

• अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे वाढत्या वयामुळे किंवा इतर कारणांमुळे बायोमेट्रिक (बोटांचे ठसे) जुळण्यात अडचणी येत होत्या. यावर तोडगा म्हणून महामंडळाने 21 सप्टेंबर 2026 पासून आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTP द्वारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे ज्या प्रवाशांचे बोटांचे ठसे जुळत नाहीत, त्यांना आता विनाअडचण नोंदणी करता येईल.

• प्रवासादरम्यान एनसीएमसी कार्ड गहाळ किंवा चोरीला गेल्यास प्रवाशांचे नुकसान होऊ नये म्हणून २१ सप्टेंबरपासून जुने कार्ड ब्लॉक करून 199 रुपये शुल्क भरून नवीन कार्ड नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

• ज्या प्रवाशांनी 19 सप्टेंबरपर्यंत आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना 25 सप्टेंबरपासून अधिकृतपणे NCMC कार्डचे वितरण सुरू केले जाईल.

• 16 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या सर्व अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना नोंदणीवेळी क्यूआर कोड (QR Code) असलेली पावती दिली जात आहे. ही पावती एसटी वाहकाकडील (Conductor) ETIM मशीनवर स्कॅन करून प्रवाशांना थेट सवलतीचे तिकीट दिले जाईल.

• ही QR कोड पावती 30 दिवसांपर्यंत ग्राह्य राहील. या 30 दिवसांच्या आत प्रवाशांनी आपले NCMC कार्ड प्राप्त करून ते ॲक्टिव्ह करणे आणि त्यात ‘टॉप-अप’ (रक्कम जमा) करणे अनिवार्य आहे.

एसटी महामंडळाचे तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन

एसटी प्रवासादरम्यान मिळणाऱ्या विविध सवलतींचा लाभ डिजिटल पद्धतीने मिळवण्यासाठी सर्व पात्र सवलतधारकांनी (अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनी) लवकरात लवकर आपली NCMC कार्ड नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button