Mumbai

काष्टी येथील परिक्रमा पॉलीटेक्निकतर्फे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान;सामान्य क्षमता चाचणी 2026 च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन; सात शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

मंगेश गायकवाड,कार्यकारी संपादक,संजीवनी न्यूज

काष्टी येथील परिक्रमा पॉलीटेक्निकतर्फे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान;सामान्य क्षमता चाचणी 2026 च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन; सात शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता, बौद्धिक क्षमता, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी आणि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्राविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने परिक्रमा पॉलीटेक्निकच्या वतीने परिसरातील विविध माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी सामान्य क्षमता चाचणी आयोजित करण्यात आली. या चाचणीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनातच स्पर्धात्मक परीक्षांची ओळख व्हावी, स्वतःच्या बौद्धिक क्षमतेचे मूल्यमापन करता यावे आणि भविष्यातील शैक्षणिक व करिअरविषयक संधींची माहिती मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू होता. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा, आत्मविश्वास आणि गुणवत्ता वाढीस लागण्यास मदत होणार आहे.

या सामान्य क्षमता चाचणीत स्व. संजयराव पोपटराव भोसले माध्यमिक विद्यालय, निमगाव खलू येथील कातोरे सार्थक विकास, पिंपळे पुनित किशोर आणि प्रतीक धुळा करनोर; श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालय, येळपणे येथील प्रणव पवार, अभिनव थोरात आणि जनार्दन थोरात; तसेच नवभारत विद्यालय, आनंदवाडी येथील अक्षरा सोनवणे, सार्थक खोडवे आणि कल्याणी लडके  तसेच पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय बाभूलसर मधील संस्कार रणदिवे,तनुजा जाधव,तेजस नागवडे. यांनी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविले.

त्याचप्रमाणे राज्य राखीव पोलीस पब्लिक माध्यमिक विद्यालय, दौंड, गट क्र. ७ येथील ईश्वरी योगेश चंदन, अनघा सचिन निघडे आणि प्रणवी बापू रोटे; श्री. गुप्तेश्वर माध्यमिक आश्रमशाळा, मोरेवस्ती, कुरकुंभ येथील समीक्षा जनार्दन कुदळे, अश्विनी शिवलाल राठोड आणि सावल्या सुभाष ओहळ; तसेच परिक्रमा पब्लिक स्कूल येथील राजवर्धन खामकर, खुशी कुमार आणि ओजस्वी भोईटे यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविले.

या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन करून त्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, मुख्याध्यापकांचे प्रोत्साहन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या उपक्रमात सहभागी शाळांचे मुख्याध्यापक श्री. घुटे दादासाहेब भिकाजी (स्व. संजयराव पोपटराव भोसले माध्यमिक विद्यालय, निमगाव खलू), श्री. विठ्ठल बुगणे (श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालय, येळपणे), श्री. सुनील गिरमकर (नवभारत विद्यालय, आनंदवाडी), श्रीमती शुभांगी मोरे (राज्य राखीव पोलीस पब्लिक माध्यमिक विद्यालय, दौंड), श्री. मकरंद पवार (श्री. गुप्तेश्वर माध्यमिक आश्रमशाळा, कुरकुंभ), सौ. उषा गावडे मॅडम (बाभूळ सर)आणि डॉ. संजीव कदम-पाटील (परिक्रमा पब्लिक स्कूल) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.

परिक्रमा संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेची ओळख करून देण्याची आणि उच्च शिक्षणाच्या विविध संधींकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळत आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींची माहिती देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशा मिळावी, हा संस्थेचा प्रयत्न आहे. अशी माहिती परिक्रमा पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी सर व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ॲड.प्रतापसिंह बबनराव पाचपुते यांनी दिली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती, आत्मविश्वास आणि शैक्षणिक प्रगतीची प्रेरणा निर्माण झाली असून, गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे परिसरातून व पालकांन मधून कौतुक होत आहे.सामान्य क्षमता चाचणी समन्वयक म्हणून प्रा. निशिकांत बाबर सर आणि प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्रा. सत्यम भवर सर यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button