Mumbai

हदयद्रावक! सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले; एक महिला गंभीर जखमी,आंबळे गावावर शोककळा

मंगेश गायकवाड,कार्यकारी संपादक,संजीवनी न्यूज

हदयद्रावक! सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले; एक महिला गंभीर जखमी,आंबळे गावावर शोककळा

पुणे

आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून दि.२९ च्या रात्री ११ च्या दरम्यानपायी घरी परतणाऱ्या झेंडे कुटुंबातील तिघांना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २९) रात्री साडेअकराच्या सुमारास शिरूर-चौफुला रस्त्यावरील हॉटेल केसरीसमोर ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. या अपघातात आणखी एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या भोषण अपघातात कौशल्या वसंत झेंडे, आरुषो दत्तात्रय झेंडे आणि सोहम राजीव झेंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धार्मिक कार्यक्रमातून आनंदाने घरी परतणाऱ्या या तिघांवर काळाने अचानक घाला घातल्याने संपूर्ण आंबळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आंबळे येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर झेंडे कुटुंबातील सदस्य रात्री पायी घरी निघाले होते. याचवेळी शिरूर-चौफुला मार्गावरील हॉटेल केसरीसमोर आलेल्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती गावात समजताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धार्मिक कार्यक्रमातून घरी परतणाऱ्या भाविकांनाही सुरक्षितपणे चालण्यासाठी रस्त्यावर जागा उरली नाही का, असा संतप्त सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे.

अपघातातील तिन्ही मृतदेहांवर शुक्रवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता आंबळे स्मशानभूमीत एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका क्षणात तीन जीव गेले, एका कुटुंबाचा आधार हरपला आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली. या हृदयद्रावक घटनेने आंबळे परिसर सुन्न झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button