Mumbai

उपजिल्हाधिकारी खेडेकर सांस्कृतिकच्या संचालकपदी

उपजिल्हाधिकारी खेडेकर सांस्कृतिकच्या संचालकपदी; गुरोळी येथील सुपुत्राचा सन्मान

वाघापूर, दि. २६ (वार्ताहर) — गुरोळी गावाचे सुपुत्र तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांची महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे गुरोळी गावासह परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रशांत खेडेकर यांनी आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रशांत खेडेकर यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकपदाची जबाबदारी स्वीकारली.

राज्य शासनाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली असून, महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी ते काम करतील.

लोककलांना राजाश्रय मिळवून देणे, विविध सांस्कृतिक उपक्रमांना गती देणे तसेच आदिवासी उपक्रम राबविणे हे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे खेडेकर यांच्या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

खेडेकर यांच्या नियुक्तीबद्दल गुरोळी ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच लोकप्रतिनिधींकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

यावेळी प्रशांत खेडेकर म्हणाले की, महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि तळागाळातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण कार्यरत राहणार आहोत.

छायाचित्र कॅप्शन:
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकपदी प्रशांत खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्रोत: वार्ताहर, संजीवनी न्यूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button